
माती, पाणी व पान देठ नमुने संकलन सेवा
माती व पाणी चाचणी करा, पिकाची गरज ओळखा आणि अचूक निर्णय घ्या.शोकुजी ॲग्रोद्वारे शेतकऱ्यांच्या शेतावरून थेट माती, सिंचनाचे पाणी आणि पानांच्या देठांचे (Petiole) नमुने संकलन. शेतकरी आपल्या पसंतीची शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळा निवडून तपासणी करू शकतात.
नोंदणीपासून अहवालापर्यंत 8 टप्पे पूर्ण सेवा.
नोंदणी करा
आपले नाव, मोबाईल नंबर, गाव आणि शेताचा तपशील प्रविष्ट करा.
सॅटेलाइट नकाशावर शेत निवडा
सॅटेलाइट नकाशावर आपल्या शेताचे अचूक स्थान आणि क्षेत्र मार्क करा.
नमुन्याचा प्रकार निवडा
नमुन्याचा प्रकार निवडा: माती, पाणी किंवा पानाचे देठ (Petiole).
पसंतीची प्रयोगशाळा निवडा
उपलब्ध यादीतून आपली पसंतीची मान्यताप्राप्त लॅब निवडा.
ऑनलाइन पेमेंट करा
नमुने संकलनासाठी ऑनलाइन पेमेंट करून बुकिंग निश्चित करा.
शेतावरून नमुने संकलन
आमचे प्रतिनिधी थेट तुमच्या शेतावर येऊन शास्त्रीय पद्धतीने नमुने घेतात.
प्रयोगशाळा तपासणी
संकलित नमुने तुमच्या निवडलेल्या मान्यताप्राप्त लॅबमध्ये जमा केले जातात.
लॅब रिपोर्ट मिळवा
प्रयोगशाळेचा अधिकृत रिपोर्ट थेट मोबाईलवर प्राप्त करा.
शोकुजी ॲग्रोची माती, पाणी व पान देठ नमुने संकलन सेवाच का निवडायची?
शेतावरून नमुने संकलन
लॅबमध्ये जाण्याचा किंवा सॅम्पल पाठवण्याचा त्रास नाही.
माती, पाणी व देठ पर्याय
पिकाच्या गरजेनुसार माती, पाणी किंवा देठ चाचणीची निवड.
शेतकऱ्यांच्या आवडीची लॅब
मान्यताप्राप्त प्रयोगशाळांपैकी स्वतःची पसंतीची लॅब निवडण्याची मुभा.
पारदर्शक दर व डिजिटल बुकिंग
स्पष्ट दर आणि इन्स्टंट बुकिंग पोच पावती.
डिजिटल बुकिंग ट्रॅकिंग
सॅम्पल संकलनाची अचूक स्थिती थेट मोबाईलवर पहा.
वेळ व पैशांची बचत
लॅबच्या वाऱ्या बंद झाल्याने वेळ आणि पैशांची मोठी बचत.
सुरक्षित नमुना वाहतूक
शास्त्रीय पद्धतीने सॅम्पल पॅकिंग व सुरक्षित वाहतूक.
अहवालानुसार खत मात्रा सल्ला
लॅब रिपोर्टच्या आधारे खतांची अचूक मात्रा व मार्गदर्शन.
सेवा उपलब्धता आणि कार्यक्षेत्र
नमुने संकलन सेवा सांगली व आसपासच्या कृषी क्षेत्रात उपलब्ध, मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या निवडीनुसार.